Google Ad
Uncategorized

सांगवी करसंकलन विभागीय कार्यालयाचा नेहमीच भोंगळ कारभार… मनसेच्या आंदोलना नंतर काहीच मिंनटात पाणी पट्टी भरण्याचा काऊन्टर सुरू

सांगवी करसंकलन विभागीय कार्यालयाचा नेहमीच भोंगळ कारभार….

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगवी करसंकलन येथे आंदोलनाची भुमीका घेतल्या बरोबर काहीच मिंनटात पाणी पट्टी भरण्याचा त्वरित काऊन्टर चालू झाला…

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी करसंकलन विभाग येथे जुनी सांगवी,नवी सांगवी,पिंपळे गुरव,पिंपळे निलख अशी गावे समाविष्ट आहे.अंदाजे ५७००० ग्राहक (टॅक्सधारक) आहेत सर्वात जास्त सांगवी करसंकलनचा भरणा होत असतो.

पण पाणी पट्टी भरणा घेण्यास नेहमीच नकार दिला जातो. आपले पिंपरी चिंचवड महापालिकका शहरात १३ करसंकलन कार्यालय आहेत इतर ठीकाणी पाणीपट्टी घेतली जाते मग सांगवी झोनला का नाही….? अशी मागणी येथे येणारे नागरिक करत आहेत.

अनेक वर्षापासून ही बोंब चालू आहे आठ दिवसापासून शेकडो नागरिकांच्या तक्रारी मनसे पदाधिकारी यांच्याकडे आल्या होत्या, नागरिकांना नेहमीच बनवा बनवीचे काम चालू असते. याबाबत कोणी विचारणा करत नाही. असे दिसून येते. या कार्यालयाकडे कसलेही परिपत्रक नाही, काही लेखी नाही, कोणाचे आदेश नाहीत फक्त आणि फक्त मनमानी कारभार या ठिकाणी सुरू असल्याचे येणाऱ्या नागरीकांना दिसत आहे.  मनाला आले पाणी पट्टी घेणे बंद करणे, वाटले तर चालू ठेवायचे……? असा कारभार या ठिकाणी सुरू असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले

यामध्ये उन्हाळा कडक असताना जेष्ठ नागरिकांची “ह” प्रभागात जाणे , तर पावसापाण्यात देखिल अतिशय अडचन होताना दिसते,  मार्च महिण्यात टॅक्स भरणा जास्त असतो अशावेळी पाणीपट्टी भरणा या ठिकाणी बंद करणे एकवेळ ठीक आहे, पण बारा महिने यांची बोंबाबोंब असते मनमानी चालू आहे, असे काही नागरीकांनी बोलताना सांगितले.

आज सांगवी येथिल करसंकलन कार्यालयात मनसेच्या वतिने शांततेत चर्चा करून नागरिकांच्या अडचनी सांगितल्या व पाणीपट्टी भरणा चालू करून घेतला आहे. तसेच यानंतर कोणत्याही प्रकारची मनमानी चालणार नाही. यापुढे तक्रारी आल्यास मनसेच्या वतिने तीव्र आंदोलन तसेच खळखट्याक करू याची दक्षता या कार्यालयाने घ्यावी, असे राजू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!