Categories: Uncategorized

चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी … मतमोजणीच्या ३७ फेऱ्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८- फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज मतमोजणी केंद्राची पाहणी केली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे,निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, निवडणूक सहाय्यक प्रशांत शिंपी, ईव्हीएम कक्षाचे समन्वयक बापूसाहेब गायकवाड, टपाली मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, डॅशबोर्डच्या समन्वयक अनिता कोटलवार आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख यांनी या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रीया नियोजनबद्धरितीने पार पाडण्याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. मतमोजणीच्यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करावे असे त्यांनी सांगितले.

*मतमोजणीच्या ३७ फेऱ्या*
मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती श्री. ढोले यांनी दिली आहे. त्यांनी इटीपीबीएस( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची चाचणीसह डॉ.देशमुख यांना माहिती दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची आवश्यक सर्व तयारी पुर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

प्रारंभी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर १४ टेबलवर पहिली फेरी सुरू होईल.  टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होतील. शेवटच्या फेरीनंतर यादृच्छिक (रँडमली) पद्धतीने व्हीव्हीपॅट काढून ५ व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. प्रत्येक फेरीनंतर झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीची उद्घोषणा शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणार आहे. शिवाय भारत निवडणूक आयोगाच्याhttps://results.eci.gov.in या लिंकद्वारे देखील उमेदवाराला फेरीनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता येणार आहे.

*चोख सुरक्षा व्यवस्था*

मतमोजणीच्या दिवशी शंकर आण्णा गावडे कामगार भवनाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे अशा व्यक्तींखेरिज इतरांना या भवनाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश असणार नाही. मतमोजणीच्या दिवशी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आणि पोलीस अधिकारी यांनी मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

Maharashtra14 News

Recent Posts

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…

3 days ago

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…

1 week ago

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…

1 week ago

मा.अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच् डी प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयातील…

2 weeks ago

बारामती येथे कर्करोग मोबाईल व्हॅन व डिजिटल हेंड हेड एक्सरे मशीनचे राज्य सभा सदस्य खा.सौ. सूनेत्रा ताई पवार यांचे हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : आज दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी महिला रुग्णालय बारामती येथे…

2 weeks ago

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सांगवी येथे आमदार चषक २०२५” उद्घाटन समारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात…

2 weeks ago