महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १९ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील लोंढे चाळ भागात पावसाचे पाणी साचत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने याभागात पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले की, पावसाचे पाणी व सांडपाणी यांचे नियोजन स्वतंत्रपणे करावे, ड्रेनेज लाईन नियमितपणे साफ करून ती कार्यक्षम ठेवावी, आवश्यकतेनुसार नवीन लाईन टाकावी व क्षमतेत वाढ करावी तसेच पाणी साचणाऱ्या भागात शाश्वत उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशीही सूचना त्यांनी केली.
महापालिकेचे सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, विनय ओव्हळ, उप अभियंता उमेश मोने, महेंद्र देवरे, शोएब शेख, कनिष्ठ अभियंता मंगेश फरताडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश लांडगे, सुनील लांडगे, युवराज लांडे, अभिमन्यू धायतोडे, मयूर थोरात यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या पाहणीवेळी जांभळे पाटील यांनी साचलेल्या पाण्याची समस्या, ड्रेनेज लाईनची क्षमता, नालेसफाईची स्थिती तसेच नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पावसाळ्यात वारंवार येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे हे महापालिकेचे प्राधान्य असून, त्यानुसार संबंधित अधिकारी व विभागांना स्पष्ट सूचना यावेळी जांभळे पाटील यांनी दिल्या. लोंढे चाळ परिसरातील नाले, गटारे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही स्तरांवर काम केले जाईल. महापालिका या समस्येचे गांभीर्याने समाधान करेल. तातडीने आवश्यक उपाययोजना सुरू करून दीर्घकालीन नियोजन आखले जाईल, असेही जांभळे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर : डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच लंडन ब्रिज, युरोपियन…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…