Google Ad
Editor Choice Health & Fitness

कोरोना लस चाचणीसाठी नवी सांगवी येथील युवक ‘शशिकांत नागणे’ यांचा पुढाकार … भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांचा सत्कार !

महाराष्ट्र 14 न्यूज : सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली, तिसऱ्या टप्प्यातील या चाचणीमध्ये पुर्ण देशातील १६०० जणांना या लशीचा डोस देण्यात येणार आहे. आज आपल्या शहरातील श्री. शशिकांत नागणे यांनी स्वतः पुढाकार घेत आज ससून रुग्णालय येथे ही लस घेतली.

युकेमधल्या मानवी चाचणीमध्ये सहभागी झालेली एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे ऑक्सफर्डच्या लशीची ट्रायल थांबवण्यात आली होती. तरीसुद्धा अशा परिस्थितीत या चाचणीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवणे म्हणजे खुप मोठं मन आणि धैर्य लागत. तस पाहता शशिकांत नागणे यांना हे काही नवीन नसावं, कारण त्यांचे वडील हे आर्मी मध्ये होते म्हणुन देशप्रेमाची व आपल्या लोकांसाठी काही करण्याची भावना त्यांच्यात अगोदरच रुजलेली होती.

Google Ad

“आपण आज आहोत, उद्या असु की नाही याची काही शास्वती कधीच नसते, त्यामुळे आज जर या जागतीक महामारीमध्ये मी मानवतेच्या रक्षणासाठी योगदान देऊ शकलो तर ही माझ्यासाठी व परिवारासाठी अभिमानाची गोष्ट राहील” असं शशिकांत नागणे म्हणाले. त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामध्ये त्यांच्या घरचे तसेच डॉ.देविदास शेलार आणि मित्रपरिवाराचे त्यांना पाठबळ होतेच असेही नागणे म्हणाले.

आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने म्हणुन शशिकांत नागणे यांचा सत्कार करण्यात आम्हाला अभिमान आहे की त्यांनी या लशीच्या चाचणीसाठी आपले नाव नोंदवून लस घेतली. आम्हाला आज या दिवशी आपल्याशी भेटण्याची व आपला सत्कार करण्याची संधी मिळाली. आपणास उत्तम व निरोगी आरोग्य लाभो व आपल्या हातून देशकार्य होत आहे , अशी भावना भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकारीयांनी यावेळी बोलून दाखवली.

यावेळी शहराचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. संकेत सुरेश चोंधे, उपाध्यक्ष श्री. जवाहर मनोहर ढोरे, चिटणीस श्री. साई कोंढारे, चिटणीस पै. प्रकाश चौधरी, सोशियल मीडियाचे संयोजक श्री. विक्रांत गंगावणे व संयोजिका पुजाताई आल्हाट उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!