Google Ad
Uncategorized

इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूस घाबरुन जाऊ नये … काळजी घेण्याचे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.- १६ मार्च २०२३) :- इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूचे रुग्ण संख्येत राज्यभरात वाढ होताना दिसून येत आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सदर विषाणूचे रुग्णांची सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे.

दि.०१ जानेवारी २०२३ पासून इन्फ्लुएंझा ए H3N2 बाधित आढळून आलेली रुग्ण संख्या – ०४
यापैकी बरे झालेले रुग्ण संख्या- ०३
सद्यस्थितीत रुग्णालयामध्ये दाखल असलेली रुग्ण संख्या- ०
मृत झालेली रुग्ण संख्या- ०१

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सदर विषाणूमुळे आज दि.१६/०३/२०२३ रोजी ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला. सदर रुग्णास COPD (फुफुसाचा आजार) तसेच Atrial fibrillation (हृदयाचा आजार) हे आजार देखील होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी रुग्णालय व कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूचे रुग्णांसाठी प्रत्येकी १० खाटांचे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आलेला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, इन्फ्लुएंझा ए H3N2 या विषाणूस घाबरुन जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.

सदर आजारावर औषधोपचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.
नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा. असे डॉ.लक्ष्मण गोफणे)
सहा.आरोग्य वैद्यकिय अधिकारी तथा वैद्यकिय विभागप्रमुख
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
यांनी कळविले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!