महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : स्व. नानाजीराव शिंदे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दसपटी शिंदे घराण्याचे इतिहासकार राजरत्न जनरल के. नानासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार २०२३ हा पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी सायं. ४ वाजता पुणे महानगर पालिका साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा, पुणे-६, येथे आयोजित करण्यात आला होता.
शिंदे घराण्यातलेच आर्मी क्षेत्रामध्ये राजरत्न जनरल म्हणून नानासाहेब शिंदे जन्माला आले व ते बडोदाचे मुख्य सरसेनापती राजरत्न जनरल नानासाहेब शिंदे हे होते. त्याच प्रमाणे ग्वाल्हेर संस्थानमध्ये त्यांना राजरत्न हि पदवी प्राप्त झाली होती. त्यांच्या परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा व उद्योग क्षेत्रात विशेष कर्तृत्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रथम धार्मिक / अध्यात्मिक पुरस्कार हा श्रीक्षेत्र नारायणपुर पुरंदर पुणे येथील आदरणीय गुरुवर्य विश्वचैतन्य परमपुज्य श्री श्री श्री सद्गुरु नारायण (आण्णा) महाराज यांना प्रदान करण्यात आला. त्याच प्रमाणे उद्योग क्षेत्रात उद्योजक मा. सुभाष दादा काटे यांना तर शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलगुरू डी वाय पाटील विद्यापीठ) , व क्रीडा क्षेत्र पुरस्कार आंतरराष्ट्रीय कब्बडीपटू अशोक शिंदे यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. रमेश नानाजीराव शिंदे संस्थापक विष् दसपटी शिंदे-कदम समाज बांधव, सर्व शहरवासी संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…