महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जुलै) : सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा उपयोगकर्ता शुल्काची दंड वसुलीचा निर्णय आज विधानसभेत गाजला, आणि उपयोगकर्ता शुल्काची दंड वसुलीला अखेर स्थगिती मिळाली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी उपयोगकर्ता शुल्क रद्द करावे आणि वसुल केलेली दंडाची रक्कम रद्द करावी. या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सादर केली आणि प्रखरपणे भूमिका मांडली, त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे. महापालिका प्रशासन शहरातील प्रति मालमत्ता ६० रुपये प्रतिमहा अशा प्रमाणे वार्षिक ७२० रुपये अशी दि. १ जुलै २०१९ पासून ‘उपयोगकर्ता शुल्क व दंड’ वसुली सुरू केली आहे. त्याच्या विषयाला आमदार महेश लांडगे यांनी वाचा फोडली.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपयोगकर्ता शुल्क आकारणी करावी, अशी अधिसूचना दि. १ जुलै २०१९ रोजी जाहीर केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात याबाबत महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. आता दंडासहीत उपयोगकर्ता शुल्क वसुली सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे. याबाबत आमदार लांडगे यांनी आक्रमकपणे शहरवासीसांची बाजू सभागृहात मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या हद्दीतील मिळकतधारकांकडून कर वसुली करते. त्या बदल्यात कचरा, पाणी, लाईट, रस्ते अशा सुविधा दिल्या जातात. मग, कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्रपणे शुल्क वसुली करणे योग्य नाही. शास्तीकर पूर्ण माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या धर्तीवर उपयोगकर्ता शुल्क वसुलीचा निर्णय कायमस्वरुपी रद्द करावा आणिपिंपरी-चिंचवडकरांना दिलासा द्यावा, अशी सभागृहाला विनंती केली आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, तोपर्यंत शासनाने उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…