Google Ad
Editor Choice india

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह  यांचे निधन … वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९जून) : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मिल्खा सिंह यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले. आॅक्सिजन लेव्हल 56 पर्यंत गेली होता जिथे काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच आठवड्यात पत्नीचे निधन झाले होते. परंतु आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नाही.

Google Ad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निधनानंतर दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “एक महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले”.

🔴फ्लाईंग सिख मिल्खा सिंह 1960 साली रोम ऑलिम्पिकमध्ये झालेल्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होते.

🔴200 मी आणि 400 मी धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व

🔴1958च्या कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक

🔴अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू

🔴आशियाई स्पर्धेत 4 सुवर्णपदक

🔴1956, 1960 आणि 1964 सालच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व

🔴1960 च्या रोम ऑलम्पिकच्या ४०० मी च्या अंतिम सामन्यात थोडक्यात पदक हुकलं

🔴1959 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मान

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!