Google Ad
Editor Choice

IND vs SL : टीम इंडियाने इतिहास घडवला , पाकिस्तानला मागे टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जुलै) : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) रोमांचक विजय झाला आहे, याचसोबत भारताने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय टीमने केला आहे. भारताने श्रीलंकेचा एकूण 126 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पराभव केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने श्रीलंकेला 125 मॅचमध्ये धूळ चारली.

पाकिस्तानने (Pakistan) श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 231 (टेस्ट, वनडे आणि टी20) मॅच खेळल्या आहेत. या यादीत भारत 224 मॅचसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 154 मॅच खेळल्या आहेत. विजयी टक्केवारीमध्ये मात्र ऑस्ट्रेलियन टीम सगळ्यात पुढे आहे. ऑस्ट्रेलियाने 144 मॅचपैकी 88 मॅचमध्ये श्रीलंकेला धूळ चारली, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी 61.11 एवढी आहे. ऑस्ट्रेलियाला 44 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर 8 मॅच ड्रॉ झाल्या.

Google Ad

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी-20 मिळून 224 मॅच खेळल्या, यातल्या 126 मॅचमध्ये भारताचा विजय झाला. श्रीलंकेने 68 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला, तर एक मॅच टाय आणि 17 मॅच ड्रॉ झाल्या.
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 231 सामने खेळले, यापैकी 125 मॅचमध्ये पाकिस्तानला विजय मिळवला, म्हणजेच त्यांची विजयी टक्केवारी 54.11 एवढी आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 82 मॅच गमावल्या, एक मॅच टाय आणि 19 मुकाबले ड्रॉ झाले.

भारताने श्रीलंकेविरुद्ध एकूण 161 वनडे खेळल्या, यातल्या 93 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 56 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. वनडेमध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर जाला आहे.
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 155 सामन्यांपैकी 92 जिंकले. या यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू टीमने लंकेविरुद्ध 97 पैकी 61 वनडे जिंकल्या. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62 एवढी आहे.
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-5 क्रिकेटपटूंमध्ये सध्या खेळत असणारा विराट कोहली हा एकमेव आहे. विराटने 63 सामन्यांमध्ये 3,563 रन केले, यात 13 शतकांचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 5,108 रनसह पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने श्रीलंकेविरुद्ध 17 शतकं केली होती.

श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 84 वनडेमध्ये 3,113 रन केले. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (MS Dhoni) आहे, त्याने 2,383 रन केले. तर विराट 2,220 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!