Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी भाजपने मांडलेले विषय न करण्याची सुपारी घेतली का? … भाजपचा आयुक्तांना सूचक इशारा

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.२५ डिसेंबर) : आयुक्तांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारची सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप करत सत्ताधारी भाजपच्या महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर नानी घुले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, महापालिका आयुक्त राजेश पाटील हटाओचा इशारा दिला आहे.

लोकांच्या हिताची कामे केली नाही तर आता आम्हाला थेट आयुक्त हटाव म्हणून मोर्चा काढावा लागेल. असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना म्हटले आहे.

Google Ad

▶️ महापौर माई ढोरे म्हणाल्या :-
जनतेच्या हिताची कामे करताना आयुक्त दबावाखाली काम करतात. त्यात विद्यार्थ्यांसाठी ३००० टॅब खरेदीचा आमचा आग्रह असताना, तो विषयसुध्दा आयुक्तांनी थांबवला. महिला बाल कल्याण योजनेतून महिलांसाठी वाहन प्रशिक्षण (ड्रायव्हींग) चा कार्यक्रम आम्ही सुचवला पण त्यालाही निमित्त काढू खोडा घातला. शहरातील गरजू लोकांना तीन हजार रुपये अनुदान देण्यासंदर्भात देखील त्यांनी अडवणूक केली. आयुक्त है राष्ट्रवादी पक्षाच्या सांगण्यावरून अडवणूक करीत आहेत. असा आरोपही महापौर माई ढोरे यांनी केला. आयुक्त हे आता आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. असे वाटते, आयुक्त शहराचे मालक आहेत? त्यांना मालक व्हायचे असेल तर त्यांनी निवडणुका लढवाव्यात, असा उपरोधिक टोला महापौर ढोरे यांनी आयुक्तांना लगावला.

▶️ सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले :-
आयुक्त राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावाखाली काम करत आहेत हे उघड आहे. जनहिताच्या कामांना आडकाठी आणून सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याचे षड्यंत्र ते रचत असून आयुक्त राजेश पाटील या शहराचे मालक असल्याच्या अविर्भावात वागत आहेत. अनेक वार्डातील कामेसुध्दा आयुक्तांनी थांबवली आहेत. कुठल्याही कामाचे टेंडर काढू देत नाहीत. आयुक्त हे आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. अशा शब्दांत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!