महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला २३५ जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र ४९ जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी १२ दिवसांनंतर म्हणजेच ५ डिसेंबरला झाला. यानंतर आज (दि. १५ डिसेंबर) मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होत आहे. नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. एकूण ३९ मंत्री आज शपथ घेत आहेत.
निकालानंतर १२ दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी मुख्यमंत्री कोण होणार? यावर बरेच तर्क-वितर्क आणि बैठका झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? यावरून बराच काथ्याकूट झाला. अखेर ५ डिसेंबरला शपथविधीला अवघे २ तास उरले असताना एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला संमती दर्शवली आणि ५.३० वाजता आझाद मैदानावर तिघांचा शपथविधी पार पडला.
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.
कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळणार?
अखेर या सर्व चर्चांच्या फेऱ्यांनंतर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. त्यानुसार हा मंत्रीमंडळ विस्तार येत्या १४ डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे आता कुणाला कोणतं खातं मिळणार? या चर्चांवर पडदा पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे.
▶️मंत्र्यांचं नाव जबाबदारी/खातं
भाजपा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री
१ भाजपा चंद्रकांत पाटील निर्णय प्रलंबित
२ भाजपा मंगलप्रभात लोढा निर्णय प्रलंबित
३ भाजपा राधाकृष्ण विखे पाटील निर्णय प्रलंबित
४ भाजपा पंकजा मुंडे निर्णय प्रलंबित
५ भाजपा गिरीश महाजन निर्णय प्रलंबित
६ भाजपा गणेश नाईक निर्णय प्रलंबित
७ भाजपा चंद्रशेखर बावनकुळे निर्णय प्रलंबित
८ भाजपा आशिष शेलार निर्णय प्रलंबित
९ भाजपा अतुल सावे निर्णय प्रलंबित
१० भाजपा संजय सावकारे निर्णय प्रलंबित
११ भाजपा अशोक उईके निर्णय प्रलंबित
१२ भाजपा आकाश फुंडकर निर्णय प्रलंबित
१३ भाजपा माधुरी मिसाळ निर्णय प्रलंबित
१४ भाजपा जयकुमार गोरे निर्णय प्रलंबित
१५ भाजपा मेघना बोर्डीकर निर्णय प्रलंबित
१६ भाजपा पंकज भोयर निर्णय प्रलंबित
१७ भाजपा शिवेंद्रराजे भोसले निर्णय प्रलंबित
१८ भाजपा नितेश राणे निर्णय प्रलंबित
१९ भाजपा जयकुमार रावल निर्णय प्रलंबित
२० शिवसेना दादा भूसे निर्णय प्रलंबित
२१ शिवसेना गुलाबराव पाटील निर्णय प्रलंबित
२२ शिवसेना संजय राठोड निर्णय प्रलंबित
२३ शिवसेना उदय सांमत निर्णय प्रलंबित
२४ शिवसेना शंभूराज देसाई निर्णय प्रलंबित
२५ शिवसेना प्रताप सरनाईक निर्णय प्रलंबित
२६ शिवसेना योगेश कदम निर्णय प्रलंबित
२७ शिवसेना आशिष जैस्वाल निर्णय प्रलंबित
२८ शिवसेना भरत गोगावले निर्णय प्रलंबित
२९ शिवसेना प्रकाश आबिटकर निर्णय प्रलंबित
३० शिवसेना संजय शिरसाट निर्णय प्रलंबित
३१ राष्ट्रवादी काँग्रेस
हसन मुश्रीफ निर्णय प्रलंबित
३२ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे निर्णय प्रलंबित
३३ राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे निर्णय प्रलंबित
३४ राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरणे निर्णय प्रलंबित
३५ राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील निर्णय प्रलंबित
३६ राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी झिरवाळ निर्णय प्रलंबित
३७ राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील निर्णय प्रलंबित
३८ राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रनील नाईक निर्णय प्रलंबित
३९ राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे निर्णय प्रलंबित
महाराष्ट्रात एकूण ४३ मंत्र्यांचं मंत्रीमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यापैकी एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे कोणत्या अतिरिक्त खात्यांचा पदभार सोपवला जाणार, याविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…