‘STIC’ अर्थात स्मार्ट ट्रेनिंग अॅण्ड इनोव्हेशन सेंटर या उपक्रमाचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि. ४ ऑगस्ट २०२१) : पिंपरी चिंचवड ही श्रमिकांची नगरी आहे व पुणे हे विद्येचे माहेरघर आहे . श्रमिकाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देवून रोजगारभिमुख करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे . त्यासाठी पिंपरी चिचवड महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य या उपक्रमाला करेल असे मत आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी व्यक्त केले .

कोरोना महामारीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक बदल झाले आहेत त्याच बरोबर पारंपरिक पद्धतीने व्यवसाग करण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल होत आहेत सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असून त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे . परंतु त्याच वेळी नवीन संधीदेखील उपलब्ध होत आहेत . या बदलत्या काळामध्ये तरणांना वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी नि आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटरएमटीआयसी ) ची स्थापना करण्यात आली आहे . त्याचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप आणि साविषीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा . नितीन करमाळकर यांच्या हस्ते करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते .

यावेळी महापार उपा उर्फ माई ढोरे , आयुक्ता राजेश पाटील , इनोव्हेशन , इन्क्यूबेशन आणि लिंकेजेसच्या संचालिका डॉ . अपूर्वा पालकर , प्र.कुलगुरू एन.एम. उमराणी , कुलसचिव डॉ . प्रफुल्ल पवार , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण , सहास्यक आयुक्त अण्णा बोदडे , अशोक भालकर व इतर मान्यवर उपस्थित होते .

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ म्हणाले , बुद्धिमत्ता आणि श्रम एकत्र आले तर प्रगती करता येते . विविध भाषांचे प्रशिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी परदेशी जाचे , शिक्षण थांबले तर एक संपूर्ण पिढीची प्रगती यांबते , शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून महानगरपालिकेचे एखादे विकास काम थांबले तरी चालेल पण शिक्षणासंबंधी काम थांबू देणार नाही . ज्याला बुद्धिमता आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी व श्रमिकाला विदयेची जोड देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचेही यावेळी आमदार जगताप म्हणाले .

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या , आपण २१ व्या शतकात जगत असून शिक्षण आणि कला प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची आहे . काही मुलांना आर्थिक अडचर्णीमुळे शिक्षण घेता येत नाही त्यांना या उपक्रमातून तांत्रिक शिक्षण दिले जात असल्याने त्याला भविष्यात स्वावलंबी होण्यात मदत होईल . तसेच प्रत्येक नागरिक विविध कौशल्य प्राप्त करतील व आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले , या स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह कोर्सेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल . या उपक्रमातून ३ ते ५ हजार युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत . पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या उपक्रमास पुढे नेण्यास कटिबद्ध आहे . नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत यासाठी संपूर्ण देशामध्ये एकमेव ठरेल असा हा उपक्रम महापालिका आणि राज्यातील अग्रगण विद्यापीठ यांच्या वतीने राबविण्यात येत आहे . या माध्यमातून भविष्यातील औद्योगिक क्रांतीसाठी बुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

रोजगारनिर्मितीच्या संदर्भात हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे . युवकाना उद्योगांना जावश्यक ठरेल असे प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी उपलब्ध होतील . शहराच्या आसपास अमणा , या उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे उद्योगांवर आधारित असलेल्या महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल . या उपक्रमा अंतर्गत सुरुवातीला एकूण ४ प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहेत .

त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट- अम्यूर क्लाउड अॅडमिनिस्ट्रेशन , रेडहंट – लिनक्सा अॅडमिनिस्ट्रेशन , संप एवीएपी अँड एमएम फॉर अकाऊंटा , फायनान्स अॅट बैंक ऑफिम अष्ट ऑटोकॅड इन डिजाईन फ्रॉम ऑटोडेस्क यांचा समावेश आहे . सुरवातीला रेकॉर्डिंग आणि लाइण्ड सेशनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल . पुढे कालांतराने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल . सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अन्यत्र उपलब्ध असणाऱ्या प्रशिक्षण शुरुकाच्या तुलनेत या प्रशिक्षणाने शुल्क अल्पत माफक ठेवण्यात आले आहे एमटीशयनी उपक्रमाची काही वैशिष्टये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत .

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगारसंधी बाहतील , अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे त्यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील , औद्योगिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणान्या मान्यवरांकडून रोजगारक्षम मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रशिक्षण कार्यक्रम आणि तज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण घेण्याची संधी अशी या प्रशिक्षण कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत . आणखी महत्वाची बाब म्हणजे हे तांत्रिक प्रशिक्षण असून अनेक 1/2 प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत .

या प्रशिक्षणामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित नसलेल्या युवकानदेखील तांत्रिक क्षेत्रातील रोजगारसंधी उपलब्ध होतील आज युवकांकडे असलेली व्यवसाग कौशल्ये भविष्यात पुरेशी ठरतीलन असे नाही या वस्तुस्थितीच्या आधारावर सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे . नव्याने आत्मसात केलेली कौशल्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील . त्यामुळे युबकानी रोजगारक्षम राहण्यागाठी त्यांच्या कामाशी संबधित नवनवीन कौशल्य गतत शिकत राहणे आवश्यक आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

23 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago