Google Ad
Editor Choice

सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.मैदानावर पवनाथडी जत्रेचे उद्घाटन … पहिल्याच दिवशी खावय्यांनी केली गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १६ डिसेंबर २०२२:- महापालिकेच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असून महिलांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.मैदानावर १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते.

Google Ad

या कार्यक्रमास महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, रविकिरण घोडके, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, विजयकुमार थोरात, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, प्रशांत शितोळे, माजी प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे, हर्षल ढोरे, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या माजी सभापती उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गावडे, रंजना चिंचवडे, उषाताई भिसे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, दिलीप धुमाळ यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच यापुढेही महिलांना अशा प्रकारचे व्यासपीठ मिळावे यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असे जांभळे पाटील म्हणाले.

या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेल्या चित्रा वाघ यांनी आपले मत यावेळी मांडले. “चूल व मूल या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन स्त्रियांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या वतीने पवनाथडीच्या निमित्ताने उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद बाब आहे. त्यासोबतच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून होत असल्याबद्दल चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त केले”.

 

यावेळी बोलताना माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापूरे म्हणाले, “2007 पासून महिला सक्षमीकरणच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासंकल्पनेतून बचतगटातील महिलांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पवनाथडी जत्रेची सुरुवात करण्यात आली. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनी तयार केलेल्या वास्तुस बाजारपेठ मिळावी हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे”.

माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, शहराचा विकास साधत असताना महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक सक्षमीकरणासाठी या माध्यमातून मदत होत आहे.

माजी पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. लाईटहाउस या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार सुहास बहाद्दरपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!