Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील ‘पावन झाले आहे रुपीनगरकर, कारण या ठिकाणी साकारल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा शब्दांत आपल्या म्हणी प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने प्रवेशद्वार कमान रुपीनगरमध्ये साकारण्यात आली आहे.

हिंदूधर्मरक्षक छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करून मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्याच मराठा साम्राज्याचा वारसा पुढे चालवुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांभाळला,हिंदूत्वाच रक्षण केलं.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याने तरुनपिढी व सर्व समाज धर्म रक्षणास समाजकार्यास त्यांचा आदर्श समोर ठेऊन, प्रेरित व्हावे म्हणून रुपीनगर तळवडे मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाणच्या वतीने स्वखर्चाने रूपीनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन सोहळा रविवार दि.१३ रोजी पार पडला. या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन प्रतिष्ठाणच्या सर्व पदाधिकारी, सभासद व सर्व समाज बांधवांच्या हस्ते झाले. येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात सारा परिसर दुमदुमून गेला.

Google Ad

या उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गजानन वाघमोडे , उपाध्यक्ष दत्ता करे , उपाध्यक्ष सुनिल बनसोडे , संघटक राजेंद्र सोनटक्के, आधारस्तंभ सचिन नायकुडे, कार्याध्यक्ष शिवाजी बिटके , नितीन वाघमोडे, नाना गावडे, संजय रुपनवर, संजय भोगे , वैजनाथ सुरवसे, दयानंद सोनटक्के, सुभाष वायकुळे, रासपा भोसरी विधानसभा अध्यक्ष राजाभाऊ धायगुडे तसेच प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी,सभासद व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!