Google Ad
Editor Choice

जिल्हा रुग्णालय , पुणे येथे पोलीस चौकीचे उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र शासनाचे जिल्हा रुग्णालय आहे, या जिल्हा रुग्णालय पुणे येथे , पिंपरी- चिंचवड शहर व पुणे ग्रामीण भागातून अपघात व विविध प्रकारची न्याय वैद्यकीय प्रकरणातील रुग्ण दाखल होत असतात, तसेच नागरिकांचे लसीकरण आणि विविध आजार तपासणी उपचारासाठी नेहमीच वर्दळ असते,या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले रुग्ण त्याच बरोबर त्यांचे नातेवाईक ही असतात.  म्हणून या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये या करिता जिल्हा रुग्णालयात पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता होती . त्याचे उद्घाटन आज (दि.०१ एप्रिल) रोजी करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात २४ तास पोलिस कर्मचारी आणि या पोलीस चौकीची वारंवार मागणी होत होती. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांना उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कोणताही अनुचित प्रकार घडू नये व उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांना संरक्षण मिळावे, व रुग्णांना चांगले उपचार मिळावेत हा त्यामागचा हेतू होता. या ठिकाणी दररोज दोन पोलीस कर्मचारी कामकाज पाहणार आहेत, असे श्री सुनील टोणपे , पोलीस निरीक्षक , सांगावी पोलीस स्टेशन यांनीसांगितले.

Google Ad

सदर पोलीस चौकीचे उद्घाटन डॉ. माधव कनकवळे , जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते झाले . सदर प्रसंगी श्री. सुनील टोणपे , पोलीस निरीक्षक , सांगावी पोलीस स्टेशन, डॉ वर्षा डोईफोडे , अति. जिल्हा शल्यचिकित्सक , डॉ .संतोष देशपांडे , वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क , डॉ. प्रकाश रोकडे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक , श्री गिरी , प्रशासकीय अधिकारी व इतर रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!