Google Ad
Editor Choice

“निदान प्रकल्पा अंतर्गत” … रोटरी क्लब कात्रज पुणे यांच्या माध्यमातून IBE मशीन (स्तनांच्या कॅन्सर ची पुर्व तपासणी मशीन) लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ ऑगस्ट) : दिनांक ०१/०८ /२०२२ रोजी सकाळी आकरा वाजता लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतात सध्या महिलांना मध्ये स्तनाच्या कॅन्सर चे प्रमाण खूप वाढत आहे स्तनाच्या कॅन्सर ची पुर्व तपासणी व जनजागृती व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब कात्रज पुणे यांच्या माध्यमातून “निदान प्रकल्पा अंतर्गत” (Breast Cancer Screening & Awareness Program) लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड पुणे यांना IBE मशीन हस्तांतरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला रोटरी क्लब कात्रज पुणे च्या अध्यक्षा नमीता नाईक सर्व्हिस प्रोवायडर विवेक कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून विभाकर रामनिरथकर नितीन नाईक मिलिंद नाईक गौरी कुलकर्णी मुग्धा कुलकर्णी लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड चे सी. ई. ओ. डॉ विशाल क्षीरसागर डायरेक्टर श्रीनिवास पत्तार उपस्थित होते विवेक कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या मशिनद्वारे पुणे व पिंपरी चिंचवड मधील महिलांना साठी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करुन महिलांना मध्ये स्तनाच्या कॅन्सर ची जनजागृती करण्यात येईल

Google Ad

डायरेक्टर श्रीनिवास पत्तार यांनी सांगितले की “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून भारतात महिलांना मध्ये वाढणाऱ्या स्तनाच्या कॅन्सर चे प्रमाण कमी करणे व जनजागृती करणे यासाठी पुढील दहा महिन्यात आठ हजार महिलांची पुर्व तपासणी करु असा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमात उपस्थितांचे आभार “निदान” प्रकल्पा चे व्यवस्थापक सहदेव गोळे यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!