Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३० मध्ये डेंगू, मलेरियाच्या वाढत्या फैलावा बाबत ताबडतोब उपाययोजना कराव्यात … अक्षय वाजे यांची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६जुलै) : पावसाळा सुरु झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे थंडी वाजून येणे , ताप येणे , अंग व डोके दुखणे यामुळे डेंगू, मलेरिया साथीचा फैलाव होत आहे. याबाबतचे निवेदन तालीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय वाजे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

या निवेदनात अक्षय वाजे यांनी म्हटले आहे की, ” प्रभाग क्रमांक३० दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी मध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणत वाढत असून महापालिकच्या वतीने धूर फवारणी, औषध फवारणी , कोरडा दिवस पाळणे या उपाय योजना होताना दिसत नाही. तसेच परिसरातील नाल्यामध्ये राडारोडा , कचरा प्लास्टिक अडकून पडल्याने नाला तुंबूत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे.

Google Ad

तरी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अक्षय वाजे यांनी आयुक्त राजेश पाटील या ‘ह’ प्रभाग कार्यालयात दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!