Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मंदा फड यांनी म्युकोरमायसिसच्या वाढत असलेल्या रुग्ण संख्येला अनुसरून शहरातील नॉन कोविड हॉस्पिटल मध्ये २० टक्के बेड राखीव ठेवण्याची केली मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज : म्युकोरमायसिस याबद्दल राज्यात वाढत असलेल्या रुग्ण यांना अनुसरून शहरातील नॉन कोविड हॉस्पिटल मध्ये 20 टक्के बेड राखीव ठेवावेत व यासाठी लागणाऱ्या यंत्रणेला सुसज्ज राहण्यास सांगावे जेणेकरून या आजाराचे काही रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार करणे सोपे होईल तसेच राखीव ठेवण्यात येणाऱ्या हॉस्पिटल ची माहिती महानगरपालिकेच्या वेबसाईट व सारथी ॲप्लिकेशनवर देण्यात यावी व तशी प्रेस नोट देखील जारी करावी. असे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या मंदा फड यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनात मंदा फड यांनी असेही म्हटले आहे की, दुसरे म्हणजे संपूर्ण देशात येऊ घातलेली तिसरा लाटे बद्दलची शंका व त्यामध्ये लहान बालक हे जास्त प्रमाणात प्रभावित होऊ शकतात याची देखील शंका वर्तवण्यात येत आहे त्यास अनुसरून आपल्या शहरात असणाऱ्या नर्सिंग होम व लहान मुलांवर उपचार करणारे हॉस्पिटल यांच्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये बेड्स राखीव करण्याची तयारी करावी तिसरा लाटेला प्रभावीपणे थोपवण्यासाठी यंत्रणा उभी करताना आपल्या शहरात जम्बो कोविड केअर सेंटर प्रमाणे बेबी केअर सेंटर देखील उभारता येऊ शकते का याची चाचपणी करावी व शहरात असणाऱ्या बाल रोग तज्ञ यांची एक टास्क फोर्स तयार करावी करावी.

Google Ad

त्याचप्रमाणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता प्रभावीपणे लसीकरण करण्यात यावे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लसीकरण लवकरात लवकर करावे व शहरातील प्रभागांमध्ये येत असलेल्या रुग्ण संख्येनुसार त्या-त्या प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र वाढवता येतील का याबद्दल देखील विचार करावा अशी मागाणी मंदा शिवाजी फड शिवसेना महिला आघाडी विभाग संघटिका यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!