Google Ad
Editor Choice kolhapur Maharashtra crimes

या शहरात व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद … तलवारी, बंदुकीचे व्हिडीओज ठेवून निर्माण करत होते दहशत

महाराष्ट्र 14 न्यूज : तरुणांमध्ये सध्या विचित्र क्रेझ सुरु झालीय. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे. जो तरुण अशाप्रकारे स्वत:ची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारात पोलिसांनी दिला आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. संबंधित कारवाई शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे. कोल्हापूर नाका परिसरात राहणारा शरद इलाज तसेच आंबेडकर नगरमधील शाहरुख कामडुगी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख कामडुगी या तरुणाने व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला भयानक व्हिडीओ शेअर केला होता.

Google Ad

‘थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी’, असे शब्द या व्हिडीओत होते. तसेच व्हिडीओत तलवार, पिस्तूल हे देखील होते. याशिवाय बदला घेण्याबाबतही व्हिडीओत भाष्य करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ एकाकडून दुसऱ्याला असे अनेकांकडे फॉरवर्ड करण्यात आला. तसेत अनेकांनी असे व्हिडीओ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवले. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

अशाप्रकारचे व्हिडीओ ठेवणाऱ्या टोळीवर सायबर पोलिसाची करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारे कुणी व्हिडीओ ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर थेट पोलिसांना माहिती द्या, असं आवाहन डीवायएसपी बी महामुनी यांनी शहरातील नागरिकांना केलं आहे. तसेच आरोपींना कडक समज देण्यात आली आहे. इथून पुढे अशाप्रकारे कृत्य केलं तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!