Google Ad
Uncategorized

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून रात्रीही मोठा पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ फेब्रुवारी) : पुणे जिल्ह्यातील २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा २४ फेब्रुवारी रोजी थंडावल्या आहेत. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कडक आचारसंहिता लागू झाली असून उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा दिवस होता. भाजप, महाविकासआघाडी आणि अपक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत असल्याचे चित्र रात्री बारा नंतरही सांगवी पिंपळे गुरव या भागात मुख्य रस्त्यांवर दिसून येत होते. तसेच भरारी पथकाकडून काही ठिकाणी प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून रात्रीही मुख्य रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Google Ad

तर रविवारी मतदान असल्याने पोलिसांनी आस्थापने बंद ठेवण्यासाठी आदेश काढले आहेत. मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये आदींसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!