Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयात आज वय वर्ष १२ ते १४ वर्षे वयोगटातील १२२ विद्यार्थ्यांना कोर्बेवॅक्स दिली लस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ मार्च २०२२) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयात आज वय वर्ष १२ ते १४ वर्षे वयोगटातील १२२ विद्यार्थ्यांना कोर्बेवॅक्स लस देण्यात आली. लसीकरण कॅम्पसाठी विद्यार्थी आमि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तीन तासात १२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. 
थेरगाव रुग्णालयामार्फत इयत्ता सातवी ते नववीतील बारा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी कुलकर्णी , सिस्टर जया हिवराळे, डेटा एंट्री ऑपरेटर प्रशांत बुरसे, तसेच हेल्पर अमित बंडवाल यांनी नियोजन करून माध्यमिक विद्यालय थेरगाव या ठिकाणी लसीकरण कॅम्प यशस्वी केला.
नवीन थेरगाव रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पसाठी शिंदे मॅडम तसेच ज्येष्ठ सिस्टर मेरगेवार यांचे सहकार्य लाभले. या लसीकरण मोहिमेवेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लसीकरणाबद्दल सर्व पालकांनी यावेळी माध्यमिक विद्यालय थेरगाव तसेच थेरगाव रुग्णालय यांचे आभार व्यक्त केले. पालकांच्या संमतीने या विद्यार्थ्यांना कोर्बेवॅक्स लस देण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, पर्यवेक्षिका ए. एस. चौगुले तसेच ज्येष्ठ शिक्षक कृष्णकांत टकले यांनी कॅम्पचे यशस्वी संयोजन केले.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!