Google Ad
Editor Choice

Pune : गणेश विसर्जनच्या भर मिरवणुकीत गोळीबाराचा बदला घेण्यासाठी सुपारी … भाजपच्या माजी नगरसेवकाला बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जुलै) : पुण्यात चार वर्षांपूर्वी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत घडली होती. एका माजी नगरसेवकावर कुख्यात गुंडाने भर मिरवणुकीत गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तो नगरसेवक सुदैवाने बचावला. पण याच माजी नगरसेवकाने पुढे हल्लेखोर गुंडाला मारण्याची सुपारी दिली. याप्रकरणी पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी माजी नगरसेवकाला अटक केली आहे.

संबंधित माजी नगरसेवकाचं नाव विवेक यादव असं आहे. तो भाजपचा पुण्यातील लष्कर कॅन्टोमेंट वार्डाचा माजी नगरसेवक आहे. त्याने दोन जणांना कुख्यात गुंड बबलू गवळी याला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. यासाठी त्याने दोघांकडे 3 पिस्तूले, 7 काडतुसे आणि रोख रक्कमही दिली होती. या दोघांची राजन जॉन राजमणी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख अशी नावं आहेत. पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी दोघांना पिस्तूल पाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर सखोल चौकशी केली असता संबंधित प्रकार उघडकीस आला.

Google Ad

विवेक यादव याने ज्या राजमणीकडे बबलूची सुपारी दिली होती तो कुख्यात गुंड आहे. हा गुंड कोरोनामुळे सध्या जामिनावर बाहेर आला होता. पण याच गोष्टीचा फायदा घेत विवेक यादव याने त्याला हेरत बबलू गवळीच्या हत्येची सुपारी दिली. राजमणीला बेड्या ठोकल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. पण तेव्हापासून विवेक यादव हा फरार झाला.

पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली. पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. यादरम्यान राजस्थान गुजरात बॉर्डरवर विवेक यादव असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री गुजरात बॉर्डवर जाऊन त्याला बेड्या ठोकल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

136 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!