आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या उपस्थितीत …द न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनाक -१५ ऑगस्ट २२) :

” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” “आपण मुक्त आहोत आणि मुक्त राहू”

येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे ‘आजादी चा अमृत महोत्सव’ असल्याने सगळीकडे विशेष उत्साह जाणवत होता. सगळीकडे फुलांची रोषणाई , वरूणराजाच्या कृपेने झालेली सगळीकडची हिरवळ ,व सुंदर अशी विविध रूपात सजलेली नवीन वांस्तू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

दोनशे वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्तता होऊन अनेक लोकांच्या बलिदानासोबत ७५ वर्षे पूर्ण. अशा या स्वातंत्र्य दिनाचे विशेष महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले व गांधीजींच्या संपर्कात आलेले थोर स्वातंत्र्यसैनिक मा. विनायक सर्जेराव ताकवले , संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मणभाऊ जगताप,उपाध्यक्ष मा. विजूअण्णा जगताप, पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर माई ढोरे, उपस्थित होते. प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मणभाऊ जगताप, प्रमुख पाहुणे मा.विनायक ताकवले मा.शंकर शेठ जगताप, यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.

तर मा.सूर्यकांत गोफने, प्रतिष्ठित मान्यवर नगरसेवक, सर्व पीटीए मेंबर, कॉलेजच्या प्राचार्या मा.इनायत मुजावर मॅडम, प्रायमरीच्या मुख्याध्यापिका मा.जयश्री माळी मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ध्वजारोहनास सलामी देण्यात आली. नंतर सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीस परेडच्या माध्यमातून ध्वजासोबतच सर्वांना मानवंदना दिली. तो क्षण अत्यंत नेत्रदीपक व डोळ्यांचा पारणे फेडणारा होता.

प्राथमिक विभागाच्या छोट्या मुलांचा डंबेल्सची कवायत अत्यंत लक्षवेधी ठरली.नंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन बरोबरच लोकमान्य टिळक, गांधीजी ,भारतमाता, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , अशी वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. सगळ्यात अविस्मरणीय घटना म्हणजे भारत माता की जयचा जयघोष आणि भारत माता झालेली विद्यार्थिनी यांनी सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.छोट्या विद्यार्थ्यांनी गायलेली देशभक्ती गीतातून देशभक्ती जाणवली.

यात प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी गायलेले “शांती का उन्नती का ए वतन मेरा” या गीताने सर्वांचे लक्ष वेधले.तर ‘ए मेरे वतन के लोगो’ या नृत्याने स्व. लता दीदी ची पूर्वस्मृती जागृत होऊन डोळ्यात पाणी आले. प्राथमिकच्या छोट्या मुलांची मनोगते ऐकून उपस्थितांची मने जिंकली. यंदाचे वर्ष हे आजादीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने विशेष महत्त्वाचे ठरले. कारण इंग्रजांच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन देशाला प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाले तो आजचा शुभ दिवस. याचे महत्त्व कु.रिया धोंगडी व कु.रोशनी देसाई या विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

यावर्षी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते व्यर्थ गेलेले नाही यासाठी विविध योजना राबवत सर्वांना स्वातंत्र्य सोबत देशाच्या विकासाची शपथ देऊन ‘”सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे” हेच उद्दिष्ट ठेवून सर्वांनी समर्पित होण्याची शपथ घेतली. शेवटी प्रमुख पाहुणे व संस्थेचे सचिव मा.शंकरशेठ जगताप यांनी आपल्या भाषणातून देशात स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे, यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे, केंद्र सरकारने पण यंदाच्या स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने घरोघरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हरघर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ हा कार्यक्रम मोठ्या पातळीवर राबविल्यामुळे राष्ट्र अभिमानाची भावना निश्चितच वृद्धिंगत होऊन राष्ट्रभक्तीशी संबंधित सर्वच मूल्य जोपासले जातील अशी ग्वाही आपल्या भाषणातून दिली.

अशा या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.विजू अण्णा जगताप, सचिव मा. शंकर शेठ जगताप, सदस्य मा.स्वाती पवार मॅडम मा.देवराम पिजन सर, मा.सुर्यकांत गोफणे,तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवर, प्रतिष्ठित नगरसेवक, कॉलेजच्या प्राचार्या मा. इनायत मुजावर मॅडम ,प्रायमरी मुख्याध्यापिका मा.जयश्री माळी मॅडम व सर्व शिक्षक वृंद, तसेच चंद्ररंग पॅरामेडिकल कॉलेजचे शिक्षकवृंद व विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकजा पाचारणे व रेखा शिंदे यांनी केले तर आभार स्वाती येवले यांनी मानले शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago