Google Ad
Editor Choice

येत्या काही दिवसांत चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक राजकीय धक्के …राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मार्च) : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक जवळ आल्याने शहरात राजकीय पक्षांत इनकमिंग,आऊटगोईंग सुरु झाले आहे.

माजी नगरसेविका शोभाआदियाल आणि त्यांचा मुलगा अमर व महेंद्रसिंग आदियाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शोभा आदियाल यांनी वेणू नगर- वाकड (काळा खडक), भागाचे २००७ ते १२ मध्ये प्रतिनिधीत्व केले आहे.  आदियाल यांनी  विकासकामांच्या उद्घाटनासाठी शहरात आलेल्या फडणवीसांच्या उपस्थितीत पिंपळे निलख येथे भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी घडवून आणत पिंपळेगुरव भागात राष्ट्रवादीला धक्का दिल्याचे मानले जात आहे. या प्रवेशाच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप हे येत्या काही दिवसांत चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक राजकीय धक्के देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय संकेत दिले आहेत.

Google Ad

गेल्या पंधरा दिवसांत पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले, तर एकाने काल (ता.५) पक्षच सोडला. पाचापैकी एकाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. बाकीचेही त्याच मार्गावर आहेत. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शहर भेटीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांना आज (ता.६) प्रवेश देत भाजपने त्याची फिट्टंमफाट केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!