महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातल्या जुनी सांगवी मध्ये आनंद नगर बाळासाहेब शितोळे मार्केटच्या मागे श्रीराम अपार्टमेंट, रजनी अपार्टमेंट, श्री गणेश अपार्टमेंट या सोसायट्या समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत.
गेले अनेक वर्षांपासून महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या अधिकृत अशा तीन सोसायट्या आहेत. या सोसायटीमध्ये साधारणपणे ४० कुटुंब आपले वास्तव्य करत आहेत. परंतु त्यांना दररोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या सोसायट्यांच्या समोर व बाळासाहेब शितोळे मार्केटच्या मागे असणारा हा रस्ता गेले कित्येक वर्षे झाली समस्यांच्या विळख्यात पडला आहे, या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसत आहे, म्हणजे तिथे रस्ता आणि डांबरीकरण दिसतच नाही, तसेच बाजूला झुडुपे गवत वाढल्याचेही दिसून येत आहे, तसेच या या घानीमुळे व वाढलेल्या झुडुपांमुळे रस्ता अरुंद झाला असून व सुरुवातीला चेंबर तुटल्याने या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे, आणि आता त्यात आत्ता या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे, त्यामुळे या नागरिकांनाही आपण झोपडपट्टीत राहतो की काय,? असे वाटायला लागले आहे.
सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील स्थापत्य विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे. सांगवीतील सर्व कामे होतात – रस्ते होतात, मग आमचा रास्तच का होत नाही?, असा संतप्त सवाल येथील फ्लॅट धारक करत आहेत.
रस्त्याला लागून अनाधिकृतपणे अतिक्रमण केल्यामुळे आता मनपा दप्तरी असणारा रस्ता आज रोजी दोन ते अडीच मिटरच राहिल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे, नागरिक ही तसेच सांगतात. या सर्व बिल्डिंग या मनपाने प्लान मंजुर केलेल्या असून, वेळोवेळी मनपाचा कर भरूनही नागरिकांना रोड – लाइट – ड्रेनेज या समस्याना दररोज सामोरे जावे लागत आहे, आज या ठिकाणी जाऊन पाहिले असता रस्त्यावर डांबर दिसत नाही, खड्डे पडून त्यात पाणी साठले आहे, रुंदी कमी झाल्याने एखादी दुर्घटना घडली तर या ठिकाणी ना रुग्णवाहिका जाऊ शकत ना अग्निशामक ची गाडी जाऊ शकत .. त्यामुळे या सोसायटीत राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबियांनी इतर ठिकाणी आपले स्थलांतर केल्याचे देखील येथे राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. भविष्यात आमच्यावर ही वेळ येईल ? असे काही नागरिक म्हणतात.
आपण पाहू शकता ही परिस्थिती
त्यामुळे या ठिकाणी मनपाने रस्त्याचे नियमानुसार रुंदीकरण तसेच डांबरीकरण करून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी आनंद नगर येथील श्रीराम अपार्टमेंट, रजनी अपार्टमेंट व श्री गणेश अपार्टमेंट चे नागरिक करत आहेत, मनपाने या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे ही माफक अपेक्षा हे नागरिक करत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…