Google Ad
Editor Choice

गेल्या २४ तासांत देशात २१ हजार ८८० कोरोना रुग्णांची नोंद , ६० जणांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २२ जुलै) : गेल्या २४ तासांत देशात २१,८८० रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत ६० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर, देशातील एकूण मृतांची संख्या 525,930 वर पोहचली आहे.

देशात कोरोनाचे १,४९,४८२ रुग्ण आहेत. मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २७३ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २४४ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Google Ad

मुंबईत गेल्या २४ तासात २७३ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ०५८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. ३३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २२ हजार १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ५३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ७१३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २७१३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही.

गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२६ टक्के इतका आहे.आरोग्य यंत्रणा सतर्क-देशभरात गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार अद्यापही सुरू असताना मंकीपॉक्स ( Monkeypox ) या आजाराने ६० हून अधिक देशात प्रवेश केला आहे. यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशात आढळून आलेले दोन्ही रुग्ण परदेश प्रवास करून आले असल्याने परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांवरती विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची स्क्रीनिंग केली जात आहे.

▶️पिंपरी चिंचवड शहरातील करोना अपडेट :-

आजपर्यंत सकारात्मक (पॉजिटिव्ह) रुग्ण संख्या
३६६३९१

आज सकारात्मक (पॉजिटिव्ह) रुग्ण संख्या
२१२

आज सकारात्मक (पॉजिटिव्ह) ओमीक्रॉन रुग्ण संख्या

पी.सी.एम.सी. हद्दिमधील रहिवासी आजपर्यंत एकुण मयत संख्या
४६२५

आज मृत रुग्णांची संख्या
०० (०० मनपा हद्दीमधील
०० मनपा हद्दीबाहेरील)

मागील २४ तासात झालेले मृत्यु संख्या

अ) आज रोजी पी.सी.एम.सी. रुग्णालयात दाखल असलेलेसक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण

ब) आज रोजी पी.सी.एम.सी.मध्ये गृहविलगीकरणात असलेले सक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण
१३१३

एकुण सक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण (अ + ब)
१३२२

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!