Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवडमध्ये पवनेच्या तिरावर रंगला … हरिकिर्तनातून ‘अक्रुर महाराज साखरे’ यांचा भक्तिमय स्वर …

हेचि देवा पै मागत| चरणसेवा अखंडित||
– ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : हे श्रीविठ्ठला! तुझ्या दिव्य चरणकमलांची सेवा अखंडित, नित्य मला घडावी. हीच माझी मागणी! मला भू-वैकुंठ असणाऱ्या पंढरीत राहता यावे. माझा वास पंढरीत असावा. इथे राहिल्याने मला नित्य, सदासर्वदा हरिदासांचा संग घडेल, सत्संग घडेल. देशाच्या सेवेसाठी हुतात्मा होणाऱ्या जवानांप्रति सर्वांनी अभिमान बाळगावा. असे प्रतिपादन आपल्या हरिकिर्तनातून अक्रुर महाराज साखरे यांनी केले.

याप्रसंगी भाजपा प्रभारी आप्पासाहेब म्हासळकर, देविदास तात्या बारणे, अमोल कलाटे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, व्ही. एम. मातेरे, पिंपळे मामा, प्रकाश जवळकर , माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, सुभाष काटे, विजयशेठ जगताप, सांगवी पोलिस स्टेशनचे पी. आय. सुनील टोणपे, समाजसेवक अरुण पवार आदी मान्यवर तसेच परीसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

या सप्ताहात कोरोना काळात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पिंपरी चिंचवड मधील विविध डॉक्टर मंडळींचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानचिन्ह, श्रीफळ,पंचा देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पंचक्रोशीतील विविध धार्मिक क्षेत्रातील विविध वैष्णवांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या किर्तन सप्ताहात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील नियोजित संत तुकाराम महाराज मंदिर निर्माणासाठी व अनुसयानंदन गोशाळेसाठी विविध मान्यवरांनी आर्थिक मदत दिली. या सप्ताहानिमित्त आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना रोज अन्नदान केले जाते. प्रास्ताविक शिवानंद स्वामी महाराज यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.

टीप :- उद्या ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!