Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे संक्रमण झाले कमी … गेल्या सहा महिन्यांतील बाधितांची सर्वाधिक कमी संख्येची नोंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०८ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांतील कोरोनाच्या बाधितांची सर्वाधिक कमी संख्या आज (ता.८) आढळून आली आहे. आज शहरात ३९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूची संख्या आटोक्यात आल्याचे दिसत आहे.

सध्या रुग्णालयांत २६२ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढती साखळी तुटत असल्याचे दिसून येत आहे. शहरात कोरोनाचे संक्रमण कमी झाले आहे, तसेच गेल्या महिनाभरापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

Google Ad

शहरात गेल्या चोवीस तासांत एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!