Google Ad
Agriculture News Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव मध्ये ‘विजय जगताप’ यांनी अगदी साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरा केला ‘बैलपोळा’

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा आवडता सन म्हणजे ‘बैलपोळा’ देशावर कोरोनाच्या संसर्गाचे सावट असल्याने, आज बैलपोळा सण सर्वत्र साध्या व पारंपारिक पद्धतीने साजरा झाला असून कोरोनामुळे शासनाकडून अनेक नियम लावण्यात आलेले असल्याने शेतकऱ्यांना बैलांची मिरवणूक काढता न आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.

परंतु असे असूनही ‘पिंपळे गुरव’ येथे देखील साध्या व पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये भाद्रपद अमावास्येला येणारा शेतकऱ्यांचा आवडता बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आज सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या लाडक्या बैलांसाठी उपवास करत बैलांना आंघोळ घालून रंग रंगोटी करून सकाळ पासूनच सणामध्ये शेतकरी रमून गेले होते.

Google Ad

चिंचवडचे ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांचे बंधू ‘विजय जगताप’ आणि चिराग जयसिंग जगताप यांनीही आपल्या ‘पिंपळे गुरव’ येथील शेतावर अगदी साध्या पारंपरिकपद्धतीने बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्द दाखवून आपल्या कुटुंबा समवेत बैलपोळा सण साजरा केला. शहर कितीही स्मार्ट झाले तरी ते आपल्या बळीराजाला विसरले नाहीत, कारण त्यांच्या पुण्याईनेंच आज आपण या आहोत, असे ते सांगतात. त्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा, या सणामुळे घरात आनंदाचे वातावरण असते, यासारखे दुसरे समाधान आणि आनंद जीवनात मिळू शकत नसल्याचे ‘विजय जगताप’ आवर्जून सांगतात.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!