Google Ad
Uncategorized

जुनी सांगवी व दापोडीत रस्त्याची दुरावस्था झाल्याने मनसेचे खड्ड्यात झाडे लावून आंदोलन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : आज (दि.३० जुलै) जुनी सांगवी दापोडीत रस्त्याची दुरावस्था झाल्याने ‘प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे’ म्हणत मनसेच्या वतीने पाणी साठलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. काही दिवसापासून सतत पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन दिवस झाले सतत तक्रारी आल्यानंतर पुन्हा मनसेच्या पदाधिकांऱ्यानी पाहणी केली आणि अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसून आल्याने हे आंदोलन करण्यात आले.

त्यातील सांगवीतील काही रस्त्याचे चंद्रमणी नगर, मधुबन सोसायटी, संगम नगर, ममता नगर, बुध्दघोष सोसायटी, PMPL मुख्य बस स्टॅाप, बॅंक ॲाफ महाराष्ट्र जवळ, शितोळे नगर तसेच दापोडी भागातही दुरावस्था झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्वरीत स्थापत्य विभागाला तक्रार केल्या, पण काही उपाययोजना नाही. असे यावेळी राजू दत्तू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.

Google Ad

या सर्व भागातील दुरूस्ती होत नसल्याने स्थापत्य विभागाच्या विरोधात आज सांगवीत झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे मंगेश भालेकर उपविभाग अध्यक्ष, गणेश माने शाखा अध्यक्ष,मनोज महाजन, अलेक्सझांडर आप्पा मोझेस उप विभाग, सागर भोकरे वॉर्ड अध्यक्ष,दिलीप ठोंबरे मनसे सैनिक इत्यादी नागरिकही उपस्थित होते.

दुरूस्ती वेळेत न झाल्यास “ह” प्रभाग कार्यालय येथे लवकरच मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही राजू सावळे यांनी दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!