महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जुलै) : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने आज 40 हून अधिक अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून तुकाराम मुंढे यांना आता कृषी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. आतादेखील अवघ्या दीड महिन्यात त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.नवी मुंबई महापालिका तसेच नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलं आहे.राज्य सरकारने 3 मे 2023 ला 10 प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले होते. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्याही नावाचा समावेश होता.
आता तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली आहे. आता ते कृषी आणि एडीएफ विभागाचे सचिव असणार आहेत. गेल्या महिन्यात मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती.