Categories: Editor Choice

जुनी सांगवी येथिल अभिनव नगर येथे अनेक दिवसापासून नागरिकांच्या घरात नळाद्वारे ड्रेनेजचे मलमिश्रित दूषित पाणी पुरवठा … नागरिकांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. शहरातील जुनी सांगवी येथिल अभिनव नगर येथे अनेक दिवसापासून नागरिकांच्या घरात नळाद्वारे ड्रेनेजचे मलमिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

चार दिवसापासून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आहे. या अगोदरही एप्रिल महिण्यात अशीच परस्थिती होती पुन्हा तिच परस्थिती झाली आहे. असे येथील नागरिक सांगतात. उत्कृष्ठ मोठ्या अशा सोसायट्यामधिल चारदिवस झाले हे दूषित पिल्यामुळे बऱ्याच घरातील पुर्ण कुंटूब लहान मुलांनपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत आजारी पडले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने अभिनव नगर येथिल पाणी पुरवठा २४ बाय ७ प्रेाजेक्ट पिव्हिसी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु नागरीकांना होणाऱ्या दूषित पाण्यामुळे असे वाटते की, फक्त कररूपी नागरिकांचे पैसे खर्च झालेत पण नागरिकांचे प्रश्न मात्र अद्यापही सुटले नाहीत.

या भागात होणाऱ्या दुशीत पाण्यामुळे या भागातील नागरिकांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही  पाणी पुरवठा विभाग अद्यापही कुठलेही ठोस निर्णय घेत नाही व कामाला कोणतीही सुरवात केलेले दिसून येत नाही.

आजच मनसेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका “ह” प्रभाग पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. मनसेच्या वतीने या निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे की कोणती वाट न पाहता युध्दपातळीवर त्वरित कामाला सुरवात करावी व नागरिकांना होणारा त्रास दुर करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे राजू दत्तू सावळे
पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ शी बोलताना सांगितले.

आमच्या घरात जुलाब उलटल्याने सर्व कुंटूब आजारी आहेत ट्रिटमेंट चालू आहेत. मनपाचे अधिकारी फ्लश आऊट करून देतो बोलले, या अगोदरही असा त्रास झाला होता त्यावेळी ही फ्लश आऊट करून घाण पाणी काढून दिले होते. आमच्या लाईन मध्ये चार पाच कुटुंबातील नागरीकांना अशा घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हरीश शेट्टी (नागरिक, अभिनव नगर, जुनी सांगवी)

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago