महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. शहरातील जुनी सांगवी येथिल अभिनव नगर येथे अनेक दिवसापासून नागरिकांच्या घरात नळाद्वारे ड्रेनेजचे मलमिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
चार दिवसापासून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आहे. या अगोदरही एप्रिल महिण्यात अशीच परस्थिती होती पुन्हा तिच परस्थिती झाली आहे. असे येथील नागरिक सांगतात. उत्कृष्ठ मोठ्या अशा सोसायट्यामधिल चारदिवस झाले हे दूषित पिल्यामुळे बऱ्याच घरातील पुर्ण कुंटूब लहान मुलांनपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत आजारी पडले आहेत.
पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने अभिनव नगर येथिल पाणी पुरवठा २४ बाय ७ प्रेाजेक्ट पिव्हिसी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु नागरीकांना होणाऱ्या दूषित पाण्यामुळे असे वाटते की, फक्त कररूपी नागरिकांचे पैसे खर्च झालेत पण नागरिकांचे प्रश्न मात्र अद्यापही सुटले नाहीत.
या भागात होणाऱ्या दुशीत पाण्यामुळे या भागातील नागरिकांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही पाणी पुरवठा विभाग अद्यापही कुठलेही ठोस निर्णय घेत नाही व कामाला कोणतीही सुरवात केलेले दिसून येत नाही.
आजच मनसेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका “ह” प्रभाग पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. मनसेच्या वतीने या निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे की कोणती वाट न पाहता युध्दपातळीवर त्वरित कामाला सुरवात करावी व नागरिकांना होणारा त्रास दुर करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे राजू दत्तू सावळे
पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ शी बोलताना सांगितले.
आमच्या घरात जुलाब उलटल्याने सर्व कुंटूब आजारी आहेत ट्रिटमेंट चालू आहेत. मनपाचे अधिकारी फ्लश आऊट करून देतो बोलले, या अगोदरही असा त्रास झाला होता त्यावेळी ही फ्लश आऊट करून घाण पाणी काढून दिले होते. आमच्या लाईन मध्ये चार पाच कुटुंबातील नागरीकांना अशा घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हरीश शेट्टी (नागरिक, अभिनव नगर, जुनी सांगवी)
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…