Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकत कर पूर्णपणे माफ करा … महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राव्दारे मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.४ जानेवारी २०२२) :  बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकत कर पूर्णपणे माफ करुन शहरातील निवासी मिळकतधारकांना दिलासा देणेबाबतची मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राव्दारे केली आहे.

पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. सध्या कोरोना विषाणूचे संकट पूर्णत: टळलेले नसल्याने बरेच उद्योग, व्यवसाय हे पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार वर्गाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता ५०० चौरस फुटा पर्यंतच्या निवासी घरांचा मालमत्ता कर रद्द केल्यास सर्व सामान्य मिळकतकर धारकांना दिलासा मिळेल.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे यांचे अध्यक्षतेखालील महापालिका सर्वसाधारण सभेत पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील ५०० चौरस फुटा पर्यंतच्या निवासी मिळकतींचा कर माफ करण्याचा ठराव मंजूर झालेला आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ५०० चौरस फुटा पर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर बृहन्मुंबई महापालिकेप्रमाणेच माफ करणेत यावा अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

30 mins ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

8 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago