Google Ad
Editor Choice

पाणी पुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे महत्त्वाचे निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७जुलै) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवार दि. २९/०७/२०२१ रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

दि. २९/०७/२०२१ रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.३०/०७/२०२१ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन म.न.पा.स सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement