Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी … लसीचा साठा उपलब्ध नसल्याने ९ एप्रिल रोजी शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . ८ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वीत करण्यात आली आहेत . तथापी , लसीचा साठा उपलब्ध नसल्याने तुर्त उद्या दि . ९ एप्रिल २०२१ रोजी सदर सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहेत , अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ . पवन साळवे यांनी दिली .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ५९ लसीकरण केंद्रामार्फत सुमारे १ लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे तर खाजगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे . शहरातील एकुण २ लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे .

Google Ad

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे . लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असून साठा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमीत वेळेत सुरू करण्यात येणार आहेत . असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

721 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!