Google Ad
Editor Choice

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय … पिंपरी चिंचवडला ११ नगरसेवक वाढणार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि २७ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणने प्रमाणे 17.25 लाख आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत 128 चे आता 139 नगरसेवक म्हणजेच 11 जादाचे नगरसेवक होणार आहेत. राज्य मत्रीमंडळ बैठकीत महापालिका सदस्य संख्यावाढ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे आदेश दिले होते, आता ही रचना नवीन सदस्य संख्येप्रमाणे  करावी लागणार आहे.

राज्य सरकारने 12 लाख लोकसंखेला 126 नगरसेवक आणि त्या पुढील 40 हजार लोकसंख्येला 1 प्रमाणे सदस्य असेल, असा निर्णय केला आहे. त्या नुसार सध्या महापालिकेत 128 नगर सदस्य आहेत, त्यात आता 11 ने वाढ होणार आहे. सध्या 4 सद्स्याचा 1 प्रभाग नुसार 32 प्रभाग आहेत. नवीन रचनेत यापूर्वी 3 सदस्याचा 1 प्रभाग या प्रमाणे 128 नगरसेवकांचे 43 प्रभाग होत होते. आता ते 46 प्रभाग असतील. 45 प्रभाग 3 सदस्याचे तर एक प्रभाग 4 सद्स्याचा असेल.

Google Ad

दरम्यान, आगामी निवडणुक विचारात घेऊन प्रभागरचना तयार करण्यचे आदेश दिले दीले होते. आताच्या निर्णयामुळे संपुर्ण प्रभाग रचनेत बदल अपेक्षीत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे 40 हजार लोक संख्येचा 1 प्रभाग असणार होता आता तो साधारणता 37, 500 चा असेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!