Google Ad
Editor Choice

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहीस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील लाभार्थ्यांना स्वहीस्सा रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २४ मे – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहीस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुढील ४०% आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना ८०% स्वहिस्सा रक्कम भरण्याची मुदत दि.३१ मे २०२२ पर्यंत वाढविण्यास मा. आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११०१८ यांनी मान्यता दिली असून या मुदतीत लाभार्थ्यांनी आपली स्वहीस्सा रक्कम भरावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तरी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली ४०% आणि बोऱ्हाडेवाडी ८०% स्वहीस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करून दि. ३१ मे २०२२ पर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी, अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे.

Google Ad


अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे मा. सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग – २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चाफेकर चौक, चिंचवडगाव, पुणे- ४११०३३ या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तरी दि. ३१ मे २०२२ रोजी पर्यंत लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रकम भरावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!