Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अनाथ बालकांसाठी वात्सल्य योजना राबवा … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत . अशी अनेक मुले आहेत , ज्यांनी या महासाथीमुळे आपले आई – वडील गमावले आहेत . लहान मुले म्हणजे देशाच् भविष्य आहे. या कुटुंबातील लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हरविल्याने सदर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना सामाजिक दायित्व म्हणून सरकारने आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे .

कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना शासनाने ‘ वात्सल्य योजने ‘ अंतगर्त मोफत शिक्षण व वयाच्या १८ वर्षापर्यंत दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत करणे गरजेचे आहे . जेणेकरून अशा अनाथ मुलांचे जगणे सुसाह्य होईल व जीवनास उभारी मिळेल .

Google Ad

वात्सल्य योजनेंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण व आर्थिक मदत देण्याबाबत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना योग्य ते कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!