Categories: Editor Choice

आरटीओ’ च्या सुधारित आकृतीबंधाची अंमलबजावणी करा : दीपक मोढवे-पाटील यांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुधारित आकृतीबंध आणि ‘आरटीओ’चा दर्जा देण्याबाबत मंजूर झालेल्या प्रस्तावाची तात्काळ अंमलबजाणी करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील ‘आरटीओ’ व ‘डेप्युटी आरटीओ’ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमतोल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

तसेच, राज्यात १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. त्यात आता आणखी नऊची भर पडणार आहे. पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, पालघर, चंद्रपूर, अकोला, बोरिवली व सातारा या ‘डेप्युटी आरटीओ’ कार्यालयांचा दर्जा वाढवून त्यांना आता ‘आरटीओ’चा दर्जा देण्याचे प्रस्तावित आहे.

विविध वाहनांचे पासिंग, ओव्हरलोड वाहतूक रोखणे, महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावणे आदी प्रमुख जबाबदारी असलेल्या प्रादेशिक परिवहन खात्यात मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध सादर करण्यात आला आहे. त्याचवेळी ‘डेप्युटी आरटीओ’ची नऊ कार्यालये अपग्रेड करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.

परिवहन विभागात राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ४ हजार २३५ पदे मंजूर आहेत. परंतु, नव्या आकृतिबंधात ही संख्या  ३ हजार ८२३ वर आणण्यात आली आहे. त्यात ४१२ ने घट झाली आहे. सहपरिवहन आयुक्तांची पाच, आरटीओची १२, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तब्बल ७४ पदे वाढली आहेत, अशी माहिती दीपक मोढवे-पाटील यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामाचा वाढता व्याप आणि वाहणांची संख्या पाहता प्रादेशिक कार्यालय म्हणून अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे. याबाबत प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित असून, त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी. तसेच, नव्या आकृतीबंधानुसार पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करुन पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वाहनचालक, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आहे.
दीपक मोढवे-पाटील, शहराध्यक्ष, भाजपा वाहतूक आघाडी, पिंपरी-चिंचवड.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago