Google Ad
Editor Choice

नवी सांगवी – पिंपळे गुरवकरांनो सावधान : गल्लोगल्ली रस्त्यावर कुठेही गाडी लावाल तर द्यावा लागेल दंड, अनेकांना आली ऑनलाइन दंडाची पावती!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ मे) : पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन व नागरिक यांच्यात सुसंवाद घडविण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे, यात येणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनधिकृत नळजोड व धडक कारवाई, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग असे महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतले आहेत.

सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने प्रशासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून ‘जनसंवाद सभा महापालिका निवडणुकीनंतरही सुरूच ठेवा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Google Ad

सोमवारी (दि.०२ मे) झालेल्या जनसंवाद सभेत नसगरिकांनी अनेक तक्रारी केल्या यात नवी सांगवी परिसरात गल्लोगल्ली असणाऱ्या चारचाकी दुतर्फा असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनास सह्याचे निवेदन दिले , असे निवेदन या अगोदरही देण्यात आले होते आणि ट्रॅफिक विभागाच्या पोलिसांनी नवी सांगवीतील आदर्श नगर भागातील अनेक वाहनांना ऑनलाइन दंड मारला, रस्त्यावर लावलेल्या अनधिकृत पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो सहित ऑनलाइन दंड बसल्याचे मेसेज मोबाईल वर आल्याचे दिसून आले, हा दंड साधारण ५०० रुपये असल्याचे एका वाहनधारकाने सांगितले.

यावेळी बोलताना वाहनधारक म्हणाले की आमची गाडी (चारचाकी) ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नो पार्किंग चा फलक नसल्याने असे फलक किंवा P1/ P2 चे बोर्ड असावेत म्हणजे वाहन पार्किंग करताना काळीजी घेता येईल. तसेच हा दंड सर्वांनाच लावावा एका भागास लक्ष करू नये, असेही काही नागरिक यावेळी बोलताना म्हणाले.

मागील महिन्यातच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे अथवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर महाराष्ट्र महानगरपालिका अतिक्रमण पथक व धडक पथकाने कारवाई करावी, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत, याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.

त्यामुळे आता नवी सांगवी – पिंपळे गुरवकरांनो सावध रहा गल्लोगल्ली रस्त्यावर कुठेही गाडी लावाल तर  दंड भरण्याची तयारीही ठेवा, कारण अनेकांना वाहतूक विभाग पोलिसांकडून ऑनलाइन दंडाची पावती आली आहे, ती आपल्याला ही येऊ शकते !!!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!