Google Ad
Editor Choice

पोलिसांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास … थेट येथे, करा तक्रार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ मे) : पिंपरी चिंचवड शहरात नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच दुसरा बदल केला आहे. पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केल्यानंतर आता स्थानिक पोलिसांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हाट्स ॲप करावी, असे आवाहन करत पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी व्हाट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आला आहे. ‘पोलीस स्टेशन येथे जर आपली तक्रार घेतली नाही, तर सदरची तक्रार 9307945182 या नंबरवर व्हाट्सअपद्वारे करावी,’ असे पोलीस ठाण्यांत लावलेल्या फलकांवर नमूद केले आहे.

Google Ad

स्थानिक पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, तर नागरिकांना थेट पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व्हाट्सअपद्वारे तक्रार करता येणार आहे. या तक्रारींची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. तक्रारीची शहनिशा करून स्थानिक पोलिसांना विचारणा होणार आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त कार्यालयाकडून होणार आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तक्रारदारांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारींचे निराकरण करण्यावर आता भर दिला जात आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!