Google Ad
Uncategorized

शरद पवारांनी राजीनामा मागे न घेतल्यास सामूहिक सामूहिक राजीनामा देऊ … पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

महाराष्ट्र 24 न्यूज, “दि.०२ मे) : “शरद पवार हेआमचे दैवत”  शरद पवारयांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमची आज पर्यंतचीराजकीय वाटचाल केली आहे.  त्यांच्याच मार्गदर्शनाखालीआम्ही यापुढेही कार्यरत राहणार आहोत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावी अशी आमचीसर्वांची इच्छा असून त्यांनी राजीनामा मागे न घेतल्यास आम्हीही सामूहिक राजीनामा देऊ अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २) निवृत्तीची घोषणा केल्यानंतरराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले. शरद पवार यांनी अचानक घेतलेलानिर्णय हा कार्यकर्त्यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. त्याबाबत अजित गव्हाणेयांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, आमच्याराजकारणाची सुरुवातच शरद पवार यांच्याकडे पाहून झाली आहे. ते आमचे दैवत आणि राजकीयआदर्श आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय राजकीय क्षेत्रात काम करणे हे अशक्य आहे.

Google Ad

शहरातील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. शरदपवार हेच पक्षाचे अध्यक्ष असायला हवेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी आम्हीमागणी करत असल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, शरद पवारयांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरराष्ट्रवादीमध्येही उमटले. पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह, आजी माजीपदाधिकारी व कार्यकर्ते खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात जमा झाले होते. त्यावेळीसर्वांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष म्हणाल्या,राजकारणात तब्बल ६३ वर्ष काम करणारे,राजकारण आणि समाजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ म्हणूनआम्ही त्यांच्याकडे पाहतो. आमचे राजकीय क्षेत्रातील काम त्यांच्यामार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही. साहेबांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
यावेळी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले, पक्षाध्यक्षपदीशरद पवार यांनीच यापुढेही कार्यरत रहावे. त्यामुळे आम्हाला उर्जा मिळत राहील. शरदपवार साहेब यांनी अध्यक्षपदी राहिले पाहिजेत,अशी आमची सगळ्यांची इच्छा असल्याने त्यांनी आपलाराजीनामा मागे घ्यावा.

यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष विजयलोखंडे, वाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगताप,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापनसेल अध्यक्ष अकबर मुल्ला, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप,अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषाताई गटकळ, उत्तरभारतीय सेल अध्यक्ष लाल मोहम्मद चौधरी, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, शाम जगताप, तानाजी जवळकर, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविताताई खराडे,कार्याध्यक्षा सविताताई धुमाळ,अर्बन सेल महिला निरीक्षक लताताई ओव्हाळ, महिलासहकार्यध्यक्षा दिपालीताई देशमुख, अर्बन सेल पिंपरी विधानसभा अध्यक्षा विजयाताई काटे,सरचिटणीस राजेश हरगुडे,भोसरी विधानसभा कार्याध्यक्षा ज्योतीताई गोफणे, संपर्कप्रमुखवाहतूक सेल राजू खंडागळे, विद्यार्थी महासंघटक राहुल आहेर, युवक मुख्य संघटक शदाब खान, युवक सचिव पियुश अंकुश, चिंचवड विधानसभा अर्बन सेल महिला अध्यक्ष प्रियाताई देशमुख, महिलाउपाध्यक्ष आशाताई मराठे, युवक सचिव मेघराज लोखंडे, धनाजी तांबे, सुनील आडागळे, गणेश हरजुळे, इत्यादी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थितहोते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!