Google Ad
Editor Choice

राजकिय इच्छाशक्ति बदलल्यास स्वच्छतेत पिंपरी चिंचवड शहर होणार देशात नंबर एक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : भारतात स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी सर्वांसाठीच हा विषय नवीन होता. परंतु अशातही काहींनी या संधीच सोन करायचं ठरवलं त्यातच इंदोर शहराचा पहिला नंबर म्हणावा लागेल. सर्व शहरात जे असते आणि तेच इंदोर मध्ये होते, परंतु आता इंदोरची चर्चा संपूर्ण देशात होतेय त्याला कारणही तसेच आहे.

स्वच्छ भारत अभियानात इंदोर शहराने सलग पाच वर्षे देशात प्रथम क्रमांक पटकावला. जिकडे पाहावे तिकडे स्वच्छता कचऱ्याचा साधा तुकडाही शहरात पहायला मिळत नाही, या शहरा प्रमाणे आपले पिंपरी चिंचवड शहरही असावे त्याकरिता अधिकारी आणि पत्रकार यांनी इंदोर शहराचा दौरा केला. त्यात आम्हाला काय दिसले …

Google Ad

*प्रथम दिसली ती नागरिकांची शहर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती

*स्थानिक नगरसेवक, अधिकारी यांचे एकमेकांना असणारे सहकार्य आणि इच्छाशक्ती

*कचरा विलगिकारण करण्यासाठी घरोघरी वेगवेगळ्या प्रकारच्या डस्टबिन

*दारोदार येणारी घंटागाडी, आणि त्यात वेगवेगळ्या (ओला कचरा, सुका कचरा, इ कचरा) कंपरमेन्ट

*घंटागाडी ला GPRS सिस्टिम त्यावर अधिकारी आणि आयुक्त यांचे वाकिटॉकीवरून नियंत्रण

*घंटागाडी कोणत्याभागात फिरते त्याचे कामकाज पाहण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष

*शहर स्वच्छतेच्या स्पर्धेत स्वतः च्या चमकोगिर करीता शहरात कुठेही न लावलेले अस्ताव्यस्त फ्लेक्स

▶️इंदूर झाले चकाचक, पिंपरी चिंचवड का नाही ?

आमच्या शहराला आम्हीच स्वच्छ ठेवणार अशी मानसिकता इंदोर शहरातील नागरिकांच्या मनात तयार झाली आहे. शहर स्वच्छतेच्या कामात आमच्याकडे टक्केवारीचा विषय कुठेच नव्हता, असे मत इंदूरच्या कचरा निर्मूलनाचे नियोजन करणाऱ्या ISWM या एजन्सीचे प्रमुख यांनी ‘महाराष्ट्र14 न्यूज’शी बोलताना स्पष्ट केले.

इंदूर शहर चकाचक झाले. त्याला नागरिकांचे आणि प्रशासनाचे उत्तम नियोजन, आयुक्त- महापौरांचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य ही गोष्ट ज्याप्रमाणे कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे कचऱ्यात अजिबात भ्रष्टाचार होणार नाही, याची घेतलेली काळजी हीदेखील या ठिकाणी महत्त्वाची ठरली. आमच्याकडे टक्केवारीचा विषय कुठेच नव्हता, आमच्या नागरिकांनी राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आम्हाला मनापासून सहकार्य केले असे इंदूरच्या आयुक्त प्रतिभा पाल म्हणाल्या.

शहर स्वच्छ ठेवायचे असेल तर, आपल्या घरापासून सुरुवात करून मनपातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी आपला ‘इगो’ बाजूला ठेवावा हे प्रथम निश्चित करण्यात आले आणि त्यानंतर नियोजन करण्यात आले.

इंदूर शहराचा कायापालट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे. त्याचे प्रथम कागदावर नियोजन करण्यात आले, त्यानंतर त्याचे अद्ययावत सॉफ्टवेअर बनविण्यात येऊन प्रभागा प्रमाणे त्याचे नियोजन करून शहराच्या मध्यवर्ती भागात याची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली.

शहरातील कचरा शहरातच कसा जिरवता येईल याचे नियोजन करण्यात आले. त्याकरिता यंत्रणा उभी करण्यात आली यामध्ये कंपोस्ट खत तयार करणे, CNG गॅस तयार करणे , प्लॅस्टिक पासून वस्तू तसेच पाईप आणि पेविंग ब्लॉक तयार करणे व त्यापासून उत्पन्न मिळवणे. आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या मिळालेल्या उत्पादनातून शहर स्वच्छता करण्यास हातभार, लागत असल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला नंबर वन ठेवण्यासाठी आता हवा नागरिकांचा सहभाग, राजकीय व्यक्तींची पदाधिकाऱ्यांची निस्वार्थ इच्छाशक्ति आणि प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न … यातून हे शहर विकासाचा महामेरू ठरल्याशिवाय राहणार नाही!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!