Google Ad
Uncategorized

२ मुलांनी आत्महत्या केल्याने माझं मन व्यथित; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांचं मोठं भाष्य

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ सप्टेंबर) : गेल्या दहा दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाणावर बसले आहेत. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान, मराठा आरक्षणासाठी काही तरुण आत्महत्या देखील केल्या असल्याचे समोर आले आहे.

यामुळे माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत तरुण मुलांच्या आत्महत्येने माझं मन व्यथित झालं, असं म्हणत मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं आहे. माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘मी व्यथित असल्याने पत्रकार परिषद घेण्याचे ठरविले. मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी आणि आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहेत. २ मुलांच्या आत्महत्येने माझं मन व्यथित झालं आहे. मनोज जरांगे पाटील अनेक वर्षांपासून आमरण उपोषण करतात. मी स्वतः अनेक वेळा त्यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे’.

Google Ad

जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील असून भूमिका स्पष्ट मांडणारा व्यक्ती आहे. आरक्षण टिकणार असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे. अन्यथा समाजाला फसवण्याचा प्रकार होईल असे सरकारने करू नये. मनोज जरांगे यांच्या पाठीशी आम्ही नक्की उभे राहणार. मराठा मोर्चामधून आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या.

‘तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आरक्षण दिले पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे होत नाही असे सर्वोच्च न्यायलयाने म्हटले आहे. मी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते, पण मला सांगण्यात आले की वकील खूप महागडे आहेत. एकनाथ शिंदे यांना सुद्धा पत्र लिहिले, असे ते म्हणाले.

‘सरकारला इच्छा शक्ती असेल तर हे सगळे होऊ शकते. जस्टिस गायकवाड अहवाल हा अभ्यासपूर्ण आहे, पण आपण वकील देऊ शकलो नाहीत. यामधील काही पाने भाषांतरीत झाले नाहीत, असे संभाजीराजे पुढे म्हणाले.

‘माझं मत आहे की, सरकारला जमत नसेल आणि इच्छा शक्ती नसेल तर मी स्वतः हे करू शकतो. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे. तुम्ही विरोधात असताना टीका केली पण आता तुमचे सरकार आहे, मग आता आरक्षण द्या. मी अनेक वेळा तोंडी बोललो, पत्र लिहले पण एकदाही दखल घेतली गेली नाही, असा आरोपही संभाजीराजे यांनी केला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!