Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Dehu : आईवरून शिवी दिल्याचा राग आल्यामुळे नवऱयाने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना …  दोन तासांत खुनाचा उलगडा!

महाराष्ट्र 14 न्यूज : आईवरून शिवी दिल्याचा राग आल्यामुळे नवऱयाने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना देहूगाव वडाचा मळा येथे आज (गुरुवार) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन तासांत खुनाचा उलगडा करीत पतीला अटक केली आहे.

वैभव भगवान लामकाने (वय 24, सध्या रा. नामदेव निवास, वडाचा मळा, देहूगाव. मूळ रा. पिराची कुरोली, पंढरपूर) असे पत्नीचा खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पूजा वैभव लामकाने (वय 19) असे गळा दाबून खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आणि पूजा यांचे चार महिन्यांपूर्वी (28 जानेवारी) आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता.

Google Ad

देहूगाव वडाचा मळा येथील नामदेव निवास येथे दीड महिन्यांपासून भाडेतत्त्वावर राहत होते. आज सकाळी हृदयविकाराचा झटका येऊन पूजा बेशुद्ध झाल्याचा बनाव करीत वैभवने नातेवाइकांना फोन केला. पण, पूजाचे वडील सोमनाथ रामदास पाटील यांना संशय आल्याने पोलिसांना कळविले. वैभव याला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना वैभवने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिस खाक्‍यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण होत होते. रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते. भांडणामध्ये पूजाने आईवरून शिवी दिली. याचा राग मनात धरून वैभवने तिचा गळा दाबून खून केला होता.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ 2- चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलिस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पोलिस निरीक्षक सोन्याबापू देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक शाहिद पठाण, पोलिस उपनिरीक्षक किरण कणसे, योगेशा रामेकर, पोलिस नाईक प्रमोद उगले, अशोक पारधी, अशोक नवले, नामदेव कोंडलकर, संतोष निश्‍चित, सागर शेळके आदींनी दोन तासांमध्ये खुनाचा उलगडा करीत वैभव याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शाहिद पठाण करीत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!