Google Ad
Editor Choice

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?; फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देत पवारांनी सांगितला घटनाक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ ऑक्टोबर) : शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं होतं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी का बसवलं नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या सवालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे सांगतानाच शरद पवार यांनी फडणवीसांना कानपिचक्याही दिल्या आहेत.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उत्तर दिलं. नव्या या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे आली होती. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार असं विचारलं गेलं. त्यावेळी माझ्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत: वर केला आणि हे नेतृत्व करतील असं जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. त्यांची हातवर करायची तयारी नव्हती आणि मुख्यमंत्री व्हायचीही इच्छा नव्हती. त्यांना अक्षरश: सक्तीने मी त्यांना हात वर करायला लावला. मी त्यांचा हातवर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता. त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवारांनी सांगितलं.

Google Ad

▶️म्हणून मित्राच्या चिरंजीवाचा हात वर केला

मी उद्धव ठाकरेंना मी वयाच्या तीन चार वर्षापासून पाहिलेलं आहे. बाळासाहेब माझे मित्रं होते. त्यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते. पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब अत्यंत दिलदार होते. या गृहस्थाने महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं. शिवसेनेने योगदान दिलं. त्यामुळे जेव्हा सरकार बनविण्याची वेळ आली तेव्हा तीन पक्ष समोर होते. त्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे होते. त्यामुळे आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला भाग पाडावा ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे मी त्यांचा सक्तीने हात वर केला. त्यामुळे त्यांची निवड झाली. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं, असं त्यांनी सांगितलं.

▶️फडणवीसांना विनंती

पण माझी फडणवीसांना विनंती आहे की कृपा करून असल्या गोष्टीवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. तुम्ही पाच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत काम केलं. त्यामुळे त्यांना परस्परांचा परिचय निश्चित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर आरोप करणं योग्य नाही. म्हणून मी मुद्दाम ही वस्तुस्थिती सांगितली, असं ते म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

42 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!