Google Ad
Editor Choice

गडकरींच्या कार्यक्रमाला पवार कसे आले ? पवार म्हणतात , गडकरींच्या कार्यक्रमानंतर चार दिवसात बदल दिसतो

महाराष्ट्र 14न्यूज, (दि.०२ ऑक्टोबर) : नगरमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची मुक्तकंठाने स्तुती केली. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरींकडे पाहून लक्षात येतं, अशी स्तुती शरद पवार यांनी केली आहे.

नगरमधील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर आले होते. त्यावेळी पवारांनी गडकरींची मुक्तकंठाने स्तुती केली. हा कार्यक्रम या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा कार्यक्रम आहे. मला दुसरीकडे एक कार्यक्रम होता, पण मला रोहित पवार यांच्याकडून निरोप मिळाला की गडकरी यांनी मी यावं असं सांगितलं. त्यामुळे मला येणं भाग पडलं. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, असं पवार म्हणाले. कोणताही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे गेला तर ते त्याला पक्ष न पाहता मदत करतात, असंही त्यांनी सांगितलं.

Google Ad

गडकरींनी रस्त्यांचं जाळं विणलं
सगळ्या वाहतुकीत रस्त्यावरची वाहतूक समाजाच्या हिताची असते. हे काम गडकरी यांनी आपल्या हातात घेतला आहे. गडकरी यांनी ही जबाबदारी घेण्याआधी देशात 5 हजार किलोमीटर काम होत होत ते आता 12 हजार किलोमीटरवर गेलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

गडकरी काय म्हणाले?
नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल. त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!