Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजया आंबेडकर यांचा सांगवीत सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१एप्रिल) : येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजया आंबेडकर या ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार २९ वर्षांची प्रदीर्घ वैद्यकीय सेवा बजावुन सेवानिवृत्त झाल्या.

Google Ad

कोरोना काळात त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी जिवावर उदार होऊन आपली सेवा बजावली त्याच बरोबर जास्ती जास्त लसीकरण व्हावे यासाठी त्या प्रयत्नशिल राहिल्या व त्यांनी नागरिकांच्यात जनजागृती केली

.त्यांच्या समर्पण व सेवाभावनेला सलाम व डॉक्टरांच्या प्रति कृतज्ञता म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ शिवाजीनगर विभाग युवक अध्यक्ष सिद्धार्थ दिपकराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सांगवीत यथोचित सन्मान करण्यात आला.या वेळी ‘क्रांती प्रकाश’ फाऊंडेशनचे प्रकाश जमाले व अशोक जमाले उपस्थित होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!