Categories: Editor Choice

पिंपळे गुरव येथे माजी सैनिकांचा सन्मान, विद्यार्थी गुणगौरव आणि हजारो महिलांच्या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याने … साजरा झाला ‘शशिकांत ( आप्पा ) कदम’ यांचा आगळा वेगळा वाढदिवस

यावेळी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ११७ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, ११७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते शंकर जगताप, शशिकांत कदम तसेच इतर उपस्थित मान्यवरांना राखी बांधून सामूहिक रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला. यावेळी शशिकांत कदम यांच्या वतीने सर्व महिला भगिनींना भेट म्हणून साडी देण्यात आली.

माजी नगरसेवक शशिकांत कदम यांचा आज (१९ ऑगस्ट) वाढदिवस होता, त्यानिमित्ताने या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी गाण्याच्या ठेक्यावर डान्स आणि फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. या सर्व कार्यक्रमांनंतर आयोजक शशिकांत कदम यांच्या वतीने सर्वाना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचाही सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतल्याचे दिसून आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असताना शहरभर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन अनेकांकडून करण्यात येत आहे , परंतु शशिकांत कदम यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवताना अनेकांनी आपले बलिदान दिले त्यावेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान, तसेच भारताचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे विद्यार्थी यांचा गुणगौरव आणि बहीण भावाचे नाते सांगणारे समूहिक रक्षाबंधन असे चांगले विधायक कार्य केल्याने आज पिंपळे गुरव – सांगवी परिसरात शशिकांत आप्पा यांच्या या कार्यक्रमाची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू होती.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago